पुणे -'ईडी'ने (सक्तवसुली संचालनालय) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची आणखी चार कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांच्या शिवाजीनगर येथील गणेश खिंड परिसरात असलेल्या कार्यालयाच्या मालमत्तेवर ही कारवाई करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या अविनाश भोसलेंना ईडीने याआधी समन्स बजावले होते. त्यानंतर त्यांची ही चार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
यापूर्वी ईडीने अविनाश भोसले आणि कुटुंबातील काही सदस्यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्या पुण्यातील घरी छापेमारी देखील करण्यात आली होती. त्यानंतर भोसले यांच्या पुणे, नागपूर आणि गोवा येथील मालमत्ता जप्त करण्यात आल्या. विदेशी विनियम व्यवस्थापन कायदा 1999 (फेमा) कलम उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
याआधीही केली कारवाई
यापूर्वी केलेल्या कारवाईत ईडीने अविनाश भोसले यांच्या पुणे येथे क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या अधिपत्याखाली येणारी पुण्यातील हॉटेल वेस्ट इन, नागपूर येथील हॉटेल ली मेरिडियन, गोवा येथील हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा, याशिवाय अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यातील एक कोटी 15 लाख रुपये देखील जप्त केले आहेत.
अविनाश भोसले कोण आहेत
मूळचे सातारा जिल्ह्यातील तांबवे गावचे रहिवासी असलेले अविनाश भोसले वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने संगमनेरला गेले. अविनाश भोसले यांनी काही काळ पुण्यात रीक्षा देखील चालवली. या दरम्यान असते छोटी-मोठी बांधकामाची कंत्राट घेत असत. 1979 मध्ये त्यांनी अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (ABIL) ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
'ईडी'कडून अविनाश भोसले यांची आणखी चार कोटींची मालमत्ता जप्त - avinash bhosale on ed
यापूर्वी ईडीने अविनाश भोसले आणि कुटुंबातील काही सदस्यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्या पुण्यातील घरी छापेमारी देखील करण्यात आली होती. त्यानंतर भोसले यांच्या पुणे, नागपूर आणि गोवा येथील मालमत्ता जप्त करण्यात आल्या.
अविनाश भोसले