पुणे -पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली ( Avinash Bhosale Arrested CBI ) आहे. डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी अविनाश भोसले यांची चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र, आज अखेर सीबीआयने त्यांना अटक केली आहे.
फेमा कायद्याअंतर्गत यापूर्वी चौकशी - अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएचएफल लोन प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता. ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. तेव्हा 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.
कोण आहे अविनाश भोसले? - रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहे. कोट्यवधी रुपयांच्या एबीआयल ग्रुपचे सर्वेसर्वा भोसले आहे. अविनाश भोसले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. पुण्यात रोजगारच्या ते शोधात स्थलांतर झाले होते. सुरुवातीला रिक्षा चालक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर रिक्षा भाड्याने द्यायचा व्यवसाय केला सुरू केला. मग पाहता पाहता बांधकाम क्षेत्र आणि राज्याच्या बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून लहान मोठी कंत्राटी काम मिळवली. १९९५ ला सेना-भाजप युतीच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची काम मिळवले होते. भोसले यांचा सर्वच पक्षातील राजकीय व्यक्तींशी जवळीक आहे.
अविनाश भोसलेंना अटक केल्यानंतर कार्यालयाबाहेरील दृष्य
2017 पासून पुन्हा चर्चेत -पुण्यातील बाणेर परिसरात भोसले यांचा अलिशान व्हाइट हाऊस असा बंगला आहे. त्यावर स्वतःच्या मालकीची तीन हेलिकॉप्टर उभी केली. पण, २००७ मध्ये अविनाश भोसलेच्या प्रगतीला ब्रेक लागला आणि कस्टम विभागाने फेमा कायद्यानुसार कारवाई केली. त्यानंतर जलसंपदा घोटाळ्याचे वादळ घोंगाऊ लागलं. अविनाश भोसले यांनी मार्ग बदलला. २०१७ साली आयकर विभागाने भोसलेंच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले. २०२० मध्ये ईडी ने पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरू केला. तेव्हापासून भोसले ईडीच्या फेऱ्यात अडकले आणि आज सीबीआयने भोसले यांना अटक केली.
हेही वाचा -Sanjay Raut Criticized Sambhaji Raje : 'संभाजीराजेंना विनंती त्यांनी संपूर्ण देश ताब्यात घ्यावा'