महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे रिक्षाचालक गुरुवारी जाणार संपावर

लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक व मालकांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. रिक्षाचालकाच्या अडचणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे.

Autorickshaw strike
पुण्यात रिक्षाचालकांचा संप

By

Published : Sep 28, 2020, 3:43 PM IST

पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी, 1 ऑक्टोबर रोजी रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रिक्षाचालकाच्या अडचणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात येणार आहे. याशिवाय रिक्षा संघटनांच्या कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने, विम्याचा परतावा न मिळाल्याने आणि राज्य सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने ही संपाची हाक देण्यात आली आहे.

पुण्यात रिक्षाचालकांचा संप
याशिवाय रिक्षा पंचायत समितीचे पदाधिकारी नितीन पवार म्हणाले, कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल झालेत. अजूनही पुढचे सहा महिने राज्यातील परिस्थिती अशीच राहील, अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे, सर्वसामान्य लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्य शासन करत आहे. मग अशा परिस्थितीत ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांनी खावं काय? त्यांनी जगायचे कसे? याचे उत्तर सरकारने आम्हाला द्यावे. यामध्ये रिक्षाचालक, मालकांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. सरकारला लॉकडाऊनच्या काळात या रिक्षाचालकांचा विसर पडला आहे. रिक्षाचालकांचा प्रश्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आम्हाला प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांची बदली झाल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details