महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 19, 2022, 8:45 PM IST

ETV Bharat / city

...तर भाजपची अवस्थाही काँग्रेससारखी होईल - शांतनू गुप्ता

भारतीय जनता पक्षात व्यक्ती निवड प्रक्रिया ही कोणत्याही जातीला धरून नाही तर त्या व्यक्तीच्या कर्तुत्वाला धरून आहे. त्यामुळे आज मोदी, शाहा, फडणवीस व पाटील एकत्र आहेत. अशीच निवड प्रक्रिया राहिली तर भाजप पुढे जाणार, पक्षात एक कुटुंब पद्धत आल्यास भाजपचीही काँग्रेससारखी अवस्थ होईल, अशी प्रतिक्रिया लेखक शांतनू गुप्ता ( Author Shantanu Gupta ) यांनी दिली.

छायाचित्र
छायाचित्र

पुणे- भारतीय जनता पक्षात व्यक्ती निवड प्रक्रिया ही कोणत्याही जातीला धरून नाही तर त्या व्यक्तीच्या कर्तुत्वाला धरून आहे. त्यामुळे आज मोदी, शाहा, फडणवीस व पाटील एकत्र आहेत. अशीच निवड प्रक्रिया राहिली तर भाजप पुढे जाणार, पक्षात एक कुटुंब पद्धत आल्यास भाजपचेही ( BJP ) काँग्रेससारखे ( Congress ) हाल होतील, अशी प्रतिक्रिया लेखक शांतनू गुप्ता ( Author Shantanu Gupta ) यांनी दिली.

शांतनू गुप्ता यांच्याशी बातचित करताना प्रतिनिधी

पुण्यात आज भाजप काल आज आणि उद्या या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राम सातपुते, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे उपस्थित होते. हे पुस्तक शांतनू गुप्ता यांनी लिहले असून याचा मराठी भाषांतर मल्हार पांडे यांनी केला आहे. शांतनू गुप्ता यांनी हे पुस्तक इंग्रजीत लिहिले त्यानंतर या पुस्तकाचे 4 भाषेत भाषांतर झाले आहे. यावेळी गुप्ता बोलत होते.

हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला 2015 ला मिळाली जेव्हा भाजप जगातील मोठा पक्ष झाले. तेव्हा पासून मी हे पुस्तक लिहिहायला सुरवात केली. जेवढी पुस्तके आयुष्यात वाजली नाही तेवढी या 3 ते 4 वर्षाच्या कालखंडात वाचली आहे. 2019 ला या पुस्तकाचे इंग्रजीत प्रकाशन झाले आहे.

हेही वाचा -पुण्यात कॅनलमध्ये पडून सख्ख्या बहीण - भावाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details