महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Health Dept Paper Leak Case : आरोग्य भरती प्रकरणात आणखी एका म्होरक्याला अटक - टीईटी पेपर फुटी

राज्यभर गाजत असलेले आरोग्य भरती पेपर फुटीतील ( health dept Paper Leak Case ) पुणे सायबर पोलिसांना हवा असलेला आणखी एक म्होरक्या सायबर पोलिसांच्या हाती लागला आहे. अतुल प्रभाकर राख (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे) असे आज अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

TET Paper Leak Case
अतुल राख

By

Published : Feb 10, 2022, 12:56 PM IST

Updated : Feb 10, 2022, 1:07 PM IST

पुणे - राज्यभर गाजत असलेल्या आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ( health dept Paper Leak Case ) पुणे सायबर पोलिसांना काही दिवसापासून हवा असलेल्या एका म्होरक्याला पोलिसांनी अंकुशनगर येथून ताब्यात घेतले आहे. अतुल प्रभाकर राख (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे) असे आज (गुरुवार) अटक केलेल्या आरोपीचे नाव ( atul rakh accused arrested in TET Case ) आहे.

अटकेतील आरोपीच्या मेहुण्याला अटक -

अतुल राख हा अटकेतील आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे. पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप यांच्या सर्व अ‍ॅक्टीव्हीटी अतुल राख करायचा. त्याला पुण्यातुनच पोलिसांनी जेरबंद केले आहे.

अतुल राख याला करणार कोर्टात हजर -

आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलिसांना वडझरीचे सानप बंधू हवेत. यापैकी केवळ संजय शाहुराव सानप हा पोलिसांनी जेरबंद केले आहे. अतुल याची अटक झाल्याने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत. अतुल राख याला ताब्यात घेतले असून आज कोर्टात हजर करणार आहेत.

हेही वाचा -TET Exams Cancelled : 2020 साली झालेली टीईटी परीक्षा रद्द करा; विद्यार्थ्यांची मागणी

Last Updated : Feb 10, 2022, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details