पुणे- स्वच्छ पुणे, सुंदर पुणेच्या माध्यमातून रस्त्यालगत असलेल्या भिंतीवर आकर्षक भित्तीचित्रे काढून शहराचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यात लॉकडाऊनच्या काळात छत्रपती राजाराम पूल व बालगंधर्व पुलाच्या दोन्ही कठड्यांवर सप्तरंगांतील विविध डिझाईन साकारण्यात आली आहेत. तसेच, शारीरिक आरोग्य उत्तम राखावे, यासाठी देखील विविध मॉडेल्स करण्यात आली आहेत.
पुण्यातील पुलांना इंद्रधनुष्यातील सप्तरंगांची झळाळी; विद्युतरोषणाईचे नदीत पडते 'प्रतिबिंब' - पुण्यातील भिंतीवर रंगवली आकर्षक चित्रे
लॉकडाऊनच्या काळात छत्रपती राजाराम पूल व बालगंधर्व पुलाच्या दोन्ही कठड्यांवर सप्तरंगांतील विविध डिझाईन साकारण्यात आली आहेत. स्वच्छ पुणे, सुंदर पुणेच्या माध्यमातून शहराचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यात छत्रपती राजाराम पूल, बालगंधर्व पूल येथील सजावट चर्चेचा विषय ठरत आहेत.
पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांमध्ये सामाजिक संदेश देणारी चित्रे व मॉडेल्स साकारण्यात येत आहेत. त्यात छत्रपती राजाराम पूल, बालगंधर्व पूल येथील सजावट चर्चेचा विषय ठरत आहेत. योगासने, व्यायामप्रकारांच्या प्रतिकृती यामध्ये लावण्यात आल्या आहेत. तसेच पुलावरुन नागरिकांनी नदीमध्ये कचरा टाकू नये, यासाठी उंच जाळ्या देखील बसवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी या सजावटीवर लावण्यात आलेल्या विद्युतरोषणाईचे प्रतिबिंब नदीमध्ये पाहण्याचा आनंद देखील पुणेकर घेत आहेत.