पुणे - महापालिकेनंतर आता पुणे जिल्हा परिषदेवर (Pune ZP) प्रशासकराज आले आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज चालवण्यासाठी सल्लागार समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांमार्फत कामकाज केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी दिली आहे. यासंदर्भात 'ई टीव्ही भारत'सोबत त्यांनी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती यांची एकाच वेळी पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे १४ मार्चपासून पंचायत समित्यांवर प्रशासक आले. आता जिल्हा परिषदेवर प्रशासक राज्य आले असून, या प्रशासकांद्वारे पुणे जिल्हा परिषदेचे कामकाज चालनार आहे.
Ayush Prasad : 'पुणे जिल्हा परिषदेचा कारभार चालणार सल्लागार समितीमार्फत, नागरिकांच्या विश्वासार्हतेवर लक्ष' - पुणे जिल्हा परिषदेवर आता प्रशासक
पुणे जिल्हा परिषदेवर (Pune ZP) प्रशासकराज आले आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज चालवण्यासाठी सल्लागार समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांमार्फत कामकाज केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी दिली आहे. यासंदर्भात 'ई टीव्ही भारत'सोबत त्यांनी संवाद साधला.
असे चालणार कामकाज - स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे काम चालणार आहे. विषय समितीचे कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चालणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास निधी समितीच्या अध्यक्षपदी प्रकल्प संचालक, दोन सदस्य आणि सचिव नियुक्त करण्यात आले आहेत. पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. सरपंच सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी संबंधित तालुक्याचे सहायक गटविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य सरपंच आणि विस्तार अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत.
प्रशासक म्हणून दुसरी वेळ - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रशासक म्हणून काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. 2019 मध्ये अकोला येथे प्रशासक म्हणून काम करण्याची संधी आयुष प्रसाद यांना मिळाली होती. त्यानंतर आता परत पुणे जिल्हा परिषद येथे प्रशासक म्हणून आयुष प्रसाद काम पाहत आहेत. प्रशासक म्हणून सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी आयुष प्रसाद यांनी सांगितले.