महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Attack On Kirit Somaiya : शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजपा नेते किरीट सोमैयांवर हल्ला - पुण्यात किरीट सोमैयांवर हल्ला

पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांकडून ( Shivsena Attack Kirit Somaiya ) भाजपा नेते किरीट सोमैयांवर हल्ला करण्यात आला आहे. कोविड सेंटरची तक्रार करण्यासाठी किरीट सोमैया पुण्यात ( Kirit Somaiya In Pune ) आले होते. यावेळी सोमैयांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Attack On Kirit Somaiya By Shivsena In Pune
Attack On Kirit Somaiya By Shivsena In Pune

By

Published : Feb 5, 2022, 5:17 PM IST

Updated : Feb 5, 2022, 6:27 PM IST

पुणे -पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांकडून ( Shivsena Attack Kirit Somaiya ) भाजपा नेते किरीट सोमैयांवर हल्ला करण्यात आला आहे. कोविड सेंटरची तक्रार करण्यासाठी किरीट सोमैया पुण्यात ( Kirit Somaiya In Pune ) आले होते. यावेळी सोमैयांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, किरीट सोमैया यांनी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या हल्ल्यासंदर्भात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Reaction On Kirit Somaiya Attack ) यांनी जशासतसं उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजपा नेते किरीट सोमैयांवर हल्ला

शिवसैनिक आक्रमक -

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केली होता. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्याकरिता किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावरून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. महापालिका परिसरात शिवसैनिकांनी सोमैयांवर हल्ला केला. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीदरम्यान सोमैयांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमैयांनी काय केले होते आरोप -

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आले होते. या सेंटरमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या या मृत्यूला कोविड रुग्णालयाचे व्यवस्थापण जबाबदार आहे, असा आरोप सोमैयांनी केला होता. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेसला या कामाचा अनुभव नसताना या सेंटरचे कंत्राट देण्यात आले, असेही किरीट सोमय्या म्हणाले होते.

जशास तसं उत्तर देऊ- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला.यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर संचेती रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक झाले आहे.

ते यावेळी म्हणाले की पाण्याखालील वाळू घसरली की माणूस बेफाम होतो त्याला हे कळत नाही के आपण काय करत आहो.आत्ता शिवसैनिकांचा मूळ चेहेरा समोर यायला लागला आहे.त्यांनी कितीही काही केलं तरी सोमय्या शांत बसणार नाही.ते त्यांचा काम करतील आणि आज जे झालं आहे त्याबाबत भाजप जशास तसे उत्तर देईल आणि याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई देखील करू, असे देखील पाटील यावेळी म्हणाले.

पुण्यात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आलेले पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या अक्षरशः पायरीवर पडलेले पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले.

हेही वाचा -Lata Mangeshkar health : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, आयसीयूत उपचार सुरू

Last Updated : Feb 5, 2022, 6:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details