पुणे - पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका हॉटेल मालकावर खुनी हल्ला करण्यात आला होता. हॉटेलच्या बाहेर फोनवर बोलत बसलेल्या एका व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने सपासप वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेत रामदास आखाडे (वय 38) गंभीर जखमी झाले होते. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
हॉटेल अशोकाच्या मालकानेच गुन्हेगार असलेल्या भाच्याला हॉटेल गारवाचे मालक आखाडे यांचा खून करण्याची सुपारी दिली होती. गारवा हॉटेलमुळे अशोक हॉटेल चालत नव्हते. गारवाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता. यामुळेच ही सुपारी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लोणी कारभोर पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे.
गारवाचा रोजचा गल्ला दोन ते तीन लाखांच्या घरात असायचा तर अशोकाला केवळ ५० ते ७० हजार रुपये दररोज मिळायचे. हॉलेच गारवा बंद असेल तेव्हा मात्र अशोकाचा गल्ला दोन ते तीन लाखांच्या घरात राहायचा. यातूनच खुनाचा कट रचला. गारवा कायमचे बंद झाले तर आपल्याला दोन ते तीन लाखांचा गल्ला मिळेल असे बाळासाहेब खेडेकर आणि त्यांचा मुलगा निखिल यांना वाटले होते. त्यातून हा खून झाला आहे.
पुण्यात हॉटेल मालकावर कोयत्याने खुनी हल्ला हेही वाचा-VIDEO : बंगळूरुतील अट्टल गुन्हेगार जोसेफ बबलीची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास काकडे यांचे उरळीकांचन परिसरात प्रसिद्ध हॉटेल आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते हॉटेल बाहेरील खुर्चीवर जाऊन बसले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तीपैकी एकाने संदासा खाडे यांच्या डोक्यात वार केले. तीन ते चार जबर वार केल्यानंतर तो बाहेर उभ्या असणाऱ्या साथीदारांसह दुचाकीवरून पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यत कैद झाली आहे.
हेही वाचा-कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगा इशारा पातळीकडे; एनडीआरएफ पथक कोल्हापूरकडे रवाना
हेही वाचा-कोल्हापुरात मुसळधार : पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर; दोन दिवस रेड अलर्ट
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आखाडे यांच्यावर झालेला हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. डोक्यात जबर वार झाल्याने आखाडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा-कळंबा तलाव 'ओव्हर फ्लो', कोल्हापूरकरांसाठी ड्रोन कॅमेऱ्यातले खास दृष्य