पुणे -पुण्यातील शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर ( Former Shiv Sena MLA Mahadev Babar ) , माजी नगरसेवक नारायण लोणकर (Former corporator Narayan Lonakar ) आणि कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्यासह 8 पोलिस कर्मचाऱ्यांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी तक्रार देण्यास गेल्यानंतर हा प्रकार घडला होता. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मासे विक्रेत्याने न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती.
15 जणांवर गुन्हा दाखल- माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर, अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद,गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक मोहिते, पोलीस कर्मचारी कामथे, गरुड, नदाफ, सुब्बानवाड, सुरेखा बडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमक प्रकरण काय ? -भारत बंदच्या दिवशी आज भारत बंद आहे तुझे मासे विक्रीचे दुकान बंद कर असे म्हणत माजी आमदार बाबर यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. त्यावेळी संबंधित मासे विक्रेता हा दाद मागण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र त्यावेळी पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्या मासे विक्रेत्याला मारहाण केली होती. त्यानंतर आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्याने न्यायालायत धाव घेतली होती. त्याचा न्यायालयाकडून निकाल लागला असून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.