महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Satellite Part Issue : 'ते' उल्कापात नव्हे, तर मानवनिर्मित घटना - खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील

चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रात्री साडे सात ते आठच्या सुमारास अवकाशात प्रवाही लाल प्रकाश दिसल्याने नेमका प्रकार काय? असा प्रश्न सर्वांना पडला होता. या सर्व प्रकारावर पुण्यातील नासाच्या स्पेस एज्युकेटर आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील यांनी प्रतिक्रिया देत काल घडलेली घटना नक्कीच उल्कापाताची नव्हती. ही घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित होती, असे स्पष्ट मत लीना बोकील यांनी व्यक्त केले आहे.

लीना बोकील
लीना बोकील

By

Published : Apr 3, 2022, 3:30 PM IST

Updated : Apr 3, 2022, 3:48 PM IST

पुणे -राज्यातील अनेक ठिकाणी काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास सगळ्यांना चकित करणारी एक घटना घडली आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश भागात आकाशातून लाल रंगाच्या जळणाऱ्या काही वस्तू खाली येताना दिसून आले. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. अनेकांनी आपआपल्या परिने अंदाज लावत उल्कापात झाल्याची चर्चाही रंगल्याची पाहायला मिळाली. चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रात्री साडे सात ते आठच्या सुमारास अवकाशात प्रवाही लाल प्रकाश दिसल्याने नेमका प्रकार काय? असा प्रश्न सर्वांना पडला होता. या सर्व प्रकारावर पुण्यातील नासाच्या स्पेस एज्युकेटर आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील यांनी प्रतिक्रिया देत काल घडलेली घटना नक्कीच उल्कापाताची नव्हती. ही घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित होती, असे स्पष्ट मत लीना बोकील यांनी व्यक्त केले आहे.

खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी
काय सांगत आहे तज्ज्ञ? : एखादी सॅटेलाइटचे तुकडे किंवा चायनीज रॅकेट डिसेबल होऊन खाली कोसळले आहे. या घटनेनंतर मी एस्ट्रोनॉट कॅलेंडर देखील पाहिले, कालच्या तारखेत कुठली उल्कावर्षाव होण्याची शक्यता नव्हती. त्याचबरोबर ज्या वेळेस उल्कापात होत असते त्यावेळेस त्याची जी लाईट असते, ती पूर्णपणे नैसर्गिक असते. पण काल जे लाइट दिसत होते ते पूर्णपणे मानवनिर्मित होते हे नक्की. याउलट फेब्रुवारी २०२१ मध्ये चीनने रॉकेट लॉन्च केल होत. त्याचाच ट्रेल डीसमेंटल होऊन पृथ्वीकडे येत होता, अशी शक्यता देखील लीना बोकील यांनी वर्तवली आहे.
Last Updated : Apr 3, 2022, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details