पुणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्याजागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे आदेश देण्यात आले ( ShivSena Whip Mla ) आहेत. तर, शिंदे यांनी आम्हाला व्हीप मान्य नाही, असं म्हटलं आहे. त्यावर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मत व्यक्त केलं आहे. व्हीप नुसार शिवसेनेच्या बंडखोरांनी मतदान नाही केलं, तर त्यांची आमदारकी रद्द होऊ ( Mla Candidature May Be Canceled ) शकते, असे सरोदे ( Asim Sarode ) यांनी म्हटलं आहे.
"त्यामुळे ते शिवसेनेचाच भाग" - असीम सरोदे म्हणाले की, सुनील प्रभु यांनी व्हीप जारी केला आहे. जर उद्या शिवसेनेच्या आमदारांनी व्हीपनुसार मतदान केले नाही, तर त्यांची आमदारकी देखील धोक्यात येऊ शकते. आमदारकी रद्द देखील होऊ शकते. आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून देखील व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणती हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधनसभेने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सध्या ते शिवसेनेचाच भाग आहे, असे समजण्यात येईल.