पुणे -पुण्यातील प्रति पंढरपूर असलेल्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त तयारी करण्यात आलेली आहे. दरवर्षी या ठिकाणी पाच ते सहा लाख भावीक दर्शनाचा लाभ घेतात . होणारी गर्दी लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. तसेच मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी मंदिराला विद्युत रोषणाई - आषाढी एकादशी
आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadi Ekadashi ) पुण्यातील प्रति पंढरपूर विठ्ठलवाडीला मंदिराला ( Vitthalwadi Temple ) आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी या ठिकाणी चार ते पाच लाख नागरिक आषाढी एकादशी दर्शनासाठी येतात. तसेच या ठिकाणची यात्रा सुद्धा असते. येथे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची ( Warkari ) सोय पुणे महानगरपालिकेच्या वतीने ( Pune Municipal Corporation ) करण्यात आली आहे.
![Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी मंदिराला विद्युत रोषणाई Electric lighting for Pandharpur Vitthalwadi temple in Pune on the occasion of Ashadi Ekadashi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15781797-492-15781797-1657373653890.jpg)
पेशवेकालीन मंदिर -आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील विठ्ठलवाडी प्राचीन पेशवेकालीन मंदिर आहे. त्या मंदिराला प्रति पंढरपूर असे म्हणतात. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी चार ते पाच लाख नागरिक आषाढी एकादशी दर्शनासाठी येतात. तसेच या ठिकाणची यात्रा सुद्धा असते. या ठिकाणी येणाऱ्या त्यांची सर्व सोय पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. असे, विश्वस्ताने म्हटले आहे.
सकाळी साडेतीन पासून दर्शन -घेण्याला सुरवाततसेच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ही देण्यात करण्यात आलेला आहे. येणाऱ्या भक्तांना सोयीस्कर रित्या दर्शन घेता यावे. कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलिसी जबाबदारी घेताना दिसत आहेत. उद्या सकाळी साडेतीन वाजता काकड आरतीने मंदिरात पूजा होणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना दर्शनाचा लाभ घेता येणार येईल. सकाळी साडेतीन पासून लोक दर्शन घेण्याला सुरवात होणार आहे. त्या सर्वांची तयारी मंदिर प्रशासनाने पूर्ण केलेले आहे.