पुणे - लष्करातील स्टोअर किपर व मल्टिटास्क ड्रायव्हर व्हेईकल या पदाच्या साठ परिक्षार्थींना प्रश्नपत्रिका दिल्याची बाब पोलीस तपासात उघड ( Army exam question papers exploded ) झाली आहे. याप्रकरणी दिल्ली येथून राजेशकुमार दिनेशकुमार ठाकूर (रा. नारायणा, दिल्ली) याला पोलिसांनी अटक ( Army recruitment scam ) केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे. सतीश ढाणे, श्रीराम कदम व वानखेडे या तीन आरोपींना यापुर्वीच अटक झाली होती.
राजेश कुमार याला दिल्ली येथून ताब्यात घेतले -
या गुन्ह्यातील आरोपी सतीश ढाने, श्रीराम कदम, वानखेडे हे 70 हजार रुपये घेताना रंगेहात पोलिसांनी पकडले होते. त्यात आरोपींची 14 दिवस कोठडी घेण्यात आली होती. त्यात आरोपींना des व skt या ट्रेड ची प्रश्नपत्रिकाचे पेपर हे BRO दिल्ली येथील उच्च पदावरील राजेश कुमार (रा. 180 नारायणा दिल्ली) हा एझुक्युटिव्ही इंजिनियर/लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकारी याने दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या मुळे राजेश कुमार याला दिल्ली येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपी राजेश कुमार याला 10 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेतली असून आरोपींचे सर्व बँक अकाउंट फ्रीज केले आहेत गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.