महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

April Fools Special : एप्रिल फूल! समोरच्याला मुर्ख बनवण्याचा हा दिवस - April Fools

एप्रिल फूल फक्त भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. काही देशांमध्ये या दिवशी सुट्टीही असते. या दिवशी लोक एकमेकांची चेष्टा करतात. (April Fools ) एप्रिल फूल निमित्त लोक एकमेकांना खोडकर संदेशही पाठवतात. या दिवसाच्या पुर्वसंधेला ईटीव्ही भारतचा एक खास रिपोर्ट-

April Fools Specia
April Fools Specia

By

Published : Apr 1, 2022, 8:38 AM IST

पुणे - एप्रिल फूल फक्त भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. काही देशांमध्ये या दिवशी सुट्टीही असते. या दिवशी लोक एकमेकांची चेष्टा करतात. एप्रिल फूल निमित्त लोक एकमेकांना खोडकर संदेशही पाठवतात. प्रत्येकजण या दिवशी कोणत्याना कोणत्या मार्गाने समोरच्या व्यक्तीला एप्रिल फूल बनवत असतो.

ईटीव्ही भारतचा रिपोर्ट

एप्रिल फूल डेची सुरुवात -एप्रिल फूल दिवस प्रथम केव्हा साजरा करण्यात आला याबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नाही. परंतु लोकांचा असा विश्वास आहे की, फ्रेंच दिनदर्शिकेत होणारा बदल एप्रिल फूल डे साजरा करण्याची सुरुवात असू शकेल. म्हणून असे काही लोक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की, इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा याची अॅनी सोबत (Engagement)झाली. त्यामुळे एप्रिल फूलचा दिवस साजरा केला जातो. काही लोक या दिवसाचा संबंध हिलारिया महोत्सवाशीदेखील लावतात.

ग्रेगोरियन दिनदर्शिका जाहीर केली - सर्वात प्रसिद्ध संकल्पनांनुसार, जुन्या काळात रोमन लोक नवीन वर्षाची सुरुवात एप्रिलपासून करत असतं. तर मीडिल युरोपमध्ये नवीन वर्षाचा उत्सव 25 मार्च रोजी साजरा केला गेला. परंतु 1852 मध्ये पोप ग्रेगोरी आठव्याने ग्रेगोरियन दिनदर्शिका जाहीर केली. त्यानंतर जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात झाली.

जुन्या मार्गाने नवीन वर्ष साजरे - ग्रेगोरियन कॅलेंडर फ्रान्सने प्रथम स्वीकारले होते. परंतु लोकांच्या मते, युरोपमधील बर्‍याच देशांनी हे कॅलेंडर स्वीकारले नाही, तेव्हा बरेच लोक त्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते, ज्यामुळे लोक नवीन कॅलेंडरच्या आधारे नवीन वर्ष साजरे करू लागले. नवीन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणारे लोक जुन्या मार्गाने नवीन वर्ष साजरे करणारे लोक मूर्ख समजले गेले आणि त्यानंतर एप्रिल फूल साजरे करण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा -खुषखबर..! गुढीपाडव्यापासून राज्य होणार निर्बंधमुक्त, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details