पुणे - पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भगवान पवार (वय 56) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. सोमवारी रात्री पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
पुणे पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू
पुणे पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भगवान पवार (वय 56) असे या पोलिसाचे नाव आहे. आतापर्यंत पुणे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापूर्वी वाहतूक शाखेत काम करणारे दीपक नथुराम सावंत आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील कर्मचारी दिलीप लोंढे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भगवान पवार हे पुणे पोलीस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून ते रजेवर होते. तथापि, काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. हडपसर परिसरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना मधुमेह व उच्चरक्तदाबाचा आजार होता.
आतापर्यंत पुणे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी वाहतूक शाखेत काम करणारे दीपक नथुराम सावंत आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दिलीप लोंढे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 458 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. पुण्यात आजवर 9890 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यातील 6446 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत. तर 2986 रुग्णावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 230 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यातील 40 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.