महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सैन्य दल परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी आणखी एक अधिकारी ताब्यात - लष्कर पेपरफुटीप्रकरणी अधिकारी गजाआड

काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी तामिळनाडू येथून मेजर रँकचा लष्करी अधिकारी थिरू मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. निलगिरी, तमिळनाडू) याला अटक केली. आता दुसर्‍या लष्करी अधिकार्‍याला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुरुगन याने त्याच्याकडील व्हॉट्सपवरून भरती प्रक्रियेची प्रश्नपत्रिका पुण्यात पाठविल्याचा धक्कादायक प्रकार तपासामध्ये समोर आला आहे. सध्या मुरूगन पोलिसांच्या कोठडीत आहे.

लष्कर पेपरफुटीप्रकरणी अधिकारी गजाआड
लष्कर पेपरफुटीप्रकरणी अधिकारी गजाआड

By

Published : Mar 10, 2021, 8:03 AM IST

Updated : Mar 10, 2021, 9:02 AM IST

पुणे -सैन्य दलात होणाऱ्या शिपाई भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दिल्लीत छापेमारी करत आणखी एका लष्करी अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ताब्यात घेतलेल्या अधिकार्‍याचे नाव तपास यंत्रणांनी गुप्त ठेवले आहे. पुणे पोलीस व लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने ही संयुक्त कारवाई केली आहे.

काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी तामिळनाडू येथून मेजर रँकचा लष्करी अधिकारी थिरू मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. निलगिरी, तमिळनाडू) याला अटक केली. आता दुसर्‍या लष्करी अधिकार्‍याला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुरुगन याने त्याच्याकडील व्हॉट्सपवरून भरती प्रक्रियेची प्रश्नपत्रिका पुण्यात पाठविल्याचा धक्कादायक प्रकार तपासामध्ये समोर आला आहे. सध्या मुरूगन पोलिसांच्या कोठडीत आहे.

प्रकरणात यापूर्वी किशोर महादेव गिरी (वय ४० रा. माळेगाव, बारामती), माधव शेषराव गित्ते (वय ३८, रा. सॅपर्स विहार कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय ३१, रा. बीईजी सेंटर, खडकी, दिघी), उदय दत्तू आवटी (वय २३ रा. बीईजी, खडकी), अली अख्तरखान (वय ४७), आजादलाल महमद खान (वय३८, दोघेही रा. गणेशनगर, बोपखेल, मूळ रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश), महेंद्र चंद्रभान सोनवणे (वय ३७, रा. गायकवाडनगर, दिघी) यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. पाचोरा, ता. पाचोरा, जि. पुणे मूळ रा. ता. भडगाव, नगरदेवळा, जळगाव) यांना अटक करण्यात आली होती.

२८ फेब्रुवारी रोजी पुण्यासह भारतभरातील ४० परीक्षा केंद्रावर रिलेशन आर्मी शिपाई भरतीची परीक्षा होणार होती. या परीक्षेला देशभरातून तीस हजार विद्यार्थी बसले होते. दरम्यान या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून काही व्यक्ती ही प्रश्नपत्रिका सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना लाखो रुपये किमतीने विकणार असल्याची माहिती सदर्न कमांड मिलीटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी दोन ठिकाणी छापेमारी करत सात जणांना अटकही केली होती. हा पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण भारतात होणारी सैन्यदलाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

हेही वाचा - रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : रोमहर्षक सामन्यात इंग्लंडची भारतावर मात

Last Updated : Mar 10, 2021, 9:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details