पुणे - इतर व्यवसायांप्रमाणे वेश्या व्यवसायाला (Prostitution Business) देखील डिग्नीटी मिळाली पाहिजे. एक प्रोफेशन म्हणून ते स्विकारले पाहिजे. जर्मनीसारख्या देशात त्याकडे खूप रिस्पेक्टने पाहिले जाते. त्यावर टॅक्स वसुल केला जातो. आपल्याकडेही ते व्हायला पाहिजे. असे मत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -Amruta Fadnavis In Nagpur : अमृता फडणवीस काय म्हणल्या 'घर की मुर्गी दाल बराबर'; पहा खास व्हिडीओ
अमृता फडणवीस आज पुण्यात - भाजप पुणे शहर महिला आघाडीच्यावतीने आज पुण्यातील बुधवार पेठेत सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मुलींना कार्ड वाटप करण्यात आले. त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आल्या होत्या, यावेळी त्या बोलत होत्या.
सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसायाला परवानगी दिली - अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसायाला परवानगी दिली आहे. भारतीय संविधानानुसार आता वेश्यांनाही व्यवसाय करण्याचा अधिकार असून त्यांना त्यापासून कोणी रोखू शकत नाही. अशा प्रकारचा निर्णय दिला. त्याचबरोबर त्यांनी या निर्णयात काही अटी देखील घातल्या आहेत. मात्र, असे असले तरी या महिलांना अनेक समस्या आहेत. या महिलांना उतरत्या वयात वृदाआश्रम सुरू करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न देखील केले जाणार आहे, असे देखील यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या. तसेच या महिलांना येणाऱ्या काळात योगासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहे, असे देखील यावेळी फडणवीस म्हणाल्या.
हेही वाचा -Amruta Fadnavis : महाविकास आघाडी जगातील सर्वात भ्रष्ट सरकार; अमृता फडणवीसांची टीका