महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एकमेकांची पाठ खाजवतात, तेच महाविकास आघाडीचे जास्त आवडते - अमृता फडणवीस - handloom pune

धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृती महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) आदी उपस्थित होते.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस

By

Published : Aug 5, 2021, 2:54 PM IST

Updated : Aug 5, 2021, 4:11 PM IST

पुणे - राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकार आल्यापासून या सरकारचे मला कोणते काम जास्त आवडले तर ते एकत्र येत एकमेकांची पाठ खाजवणे, अशी मिश्किल टिप्पणी करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सरकारच्या कामगिरीवर टोला लगावला आहे. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृती महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) आदी उपस्थित होते.

हेही वाचा -अमृता फडणवीसांना समज द्या..! संघाच्या भैयाजी जोशींना शिवसेना नेत्याचे पत्र

'उलट संसर्ग वाढण्याची जास्त भीती'

पुण्यात प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेली वेळ नक्कीच या प्रदर्शनाला पुरेशी होणार नाही. जी वेळ देण्यात आलेली आहे, त्याच वेळेनुसार शॉपिंग करावी लागणार आहे. सर्वांनी मास्क घालून, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून खरेदी करा. पुण्यात 4 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असूनही शॉपिंग मॉल तसेच 4 नंतर दुकाने बंद करावी लागत आहेत. त्यामुळे गर्दी वाढत आहे. संसर्ग वाढण्याची जास्त भीतीही आहे. सध्याची परिस्थिती पाहून सरकारने पुन्हा बदल करावेत. मुंबईत पॉझिटिव्हीटी रेट जास्त असूनही मुंबईला वेगळा न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय दिला जात आहे. प्रशासनाने आता खळबळून जागे व्हायला पाहिजे, असे यावेळी अमृता फडणवीस यांनी सांगितले.

'माविआ कधीही पडेल'

माविआ सरकार विक आहे. हे केव्हा पडेल माहीत नाही. जे नेते आज दिल्लीत भेटत आहेत, ते आधीपासूनच भेटत आहेत. अचानकपणे त्यांची भेट होत नाहीये. या भेटीवरून निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

हेही वाचा -अमृता फडणवीसांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा? नव्या पोस्टवरून चर्चेचा धुरळा

'राज्यपाल निष्ठावंत'

राज्यपालांसारखे निष्ठावंत, कर्तृत्ववान व्यक्ती मी कधीही पाहिलेला नाही. राज्यपालांच्या दौऱ्याला जे विरोध करत आहेत, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नाहीत, म्हणून राग आहे. पण असे व्हायला नको, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

Last Updated : Aug 5, 2021, 4:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details