पुणे :- देशात सहकार क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात वाढवायच आहे. आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला आपलं जीवनस्थर वाढविण्यासाठी मदत करायचं आहे. लहान शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्याचे काम करायचे आहे. आणि ते काम आजचा युवकच करू शकतो. कोणत्याही ठिकाणी काम असताना या क्षेत्राला पुढं घेऊन जायचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. असे मत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. पुण्यातील वैकुंठभाई मेहेता संस्थेत दिक्षांत समारंभात (Amit Shah in Pune) ते बोलत होते.
'विद्यार्थ्यांनी नोकरी करताना त्यांना समाधान देखील मिळालं पाहिजे. जीवनात खूप संधी मिळतात. पण जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल विचार करतो. तेव्हा सर्वजण आपल्याबद्दल विचार करत असतात हा माझा अनुभव आहे. पण जेव्हा मी माझ्याच बद्दल विचार करत असतो तेव्हा कोणीही माझ्याबद्दल विचार करत नाही. आणि जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल विचार करतो तेव्हा सर्वजण आपल्याबद्दल विचार करतात. आणि हेच जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र आहे. आणि हा माझ्या जीवनातील अनुभव आहे. त्यामुळे जीवनात नेहमीच दुसऱ्यांबद्दल विचार करत रहाण्याचा' सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित मुलांना दिला.