पुणे - सीरम इन्स्टिटय़ूट पुणे महापालिकेला लस विकत देण्यासाठी तयार आहे. पण याबाबतच्या मान्यतेची परवानगी महापालिकेने केंद्र शासनाकडून आणावी, असे पत्र सीरम इन्स्टिट्यूटने महापालिकेला पाठवले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याशी पत्रव्यवहार करून पुण्याला विशेष बाब म्हणून सीरमकडून लस घेण्याची परवानगी महापालिकेने मागितली आहे. तसेच वेळ प्रसंगी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेटही घेऊ, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. तसेच हे प्रयत्न सुरू असतानाच लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याच्या प्रक्रियेसही गती दिली आहे. येत्या दोन दिवसात निविदा काढली जाईल, असेही मोहोळ यांनी सांगितलं.
माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ होम क्वारंटाईनच्या नियमांची पुण्यात आवश्यकता नाही - महापौर
हेही वाचा -लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याने ग्लोबल टेंडरला काढले, मात्र प्रतिसाद नाही - राजेश टोपे
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने कमी होत आहे. ज्यावेळेला या निर्णयाची खरी गरज होती तेव्हा हा निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, रुग्णसंख्या कमी होताना अशा पद्धतीने निर्णय घेतल्याने त्यामागील कारण समजलेलं नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका हा दाट वस्तीत झाला. त्यानंतर शहरात दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक सोसायट्यांमध्ये झाला आहे. अश्या पद्धतीचं पुन्हा नव्या नियमाची आवश्यकता पुण्यात वाटत नाही आणि तितकं ते सोपं ही नाही असं यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
खासगी रुग्णालयांसाठी लसीकरणाचे दर निश्चित करावे
खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. मात्र, खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर काही रुग्णालये 800 ते काही 900 तर काही रुग्णालये 1100 रुपये लसीकरणासाठी घेत आहेत. तशा तक्रारीही येत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवण्यात आले आहे की, ज्यापद्धतीने रेमडेसिवीर, आरटीपीसीआर यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तसे खासगी रुग्णालयातील लसीकरणाचेही दर निश्चित करण्यात यावे, असे पत्रही यावेळी मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.
हेही वाचा -अन् रोहित पवार झाले सैराट..कोविड सेंटरमध्ये झिंगाटवर केला अफलातून डान्स