पुणे - काल (शुक्रवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सारथीबाबत जी बैठक झाली, त्याबैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्या बैठकीत अजित पवार यांनी जी आश्वासने दिली आहेत, ती ते पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास वाटतो आहे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली.
त्या बैठकीत जे चुकीचे शासन निर्णयक परिपत्रक काढले होते, ते निर्णय शासनाच्या निदर्शनात आणून दिली. गेल्या सात महिन्यांपासून जे सारथीजवळ शिल्लक असलेले पैसे होते, ते विद्यार्थ्यांना विविध योजनेसाठी वापरण्यासाठी सरकारकडे मान्यतेसाठी पाठवले होते, ते मान्य झाले नव्हते. तसेच फेलोशिपची बाब समिक्षेच्या नावाखाली रोखून ठेवले होते. तो आठ कोटींची निधी वापरण्यासाठी काल झालेल्या बैठकीत परवानगी देण्यात आली. तसे पत्र दिले असून त्याचबरोबर तारादूतांचे जे मानधन रखडल होते, तेही देण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती कोंढरे यांनी दिली.