पुणे -पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांची इतर ठिकाणी बदली झाली असून त्यांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी, त्यांनी त्यांचे बंधू आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. सख्खा भाऊ आर.आर. पाटील हे 12 वर्ष गृहमंत्री असताना देखील सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी 20 वर्ष साईड ब्रँच ला काम केल्या असल्याची आठवण त्यांनी करून दिली. त्यांनी गृहामंत्र्यांचे भाऊ म्हणून कधी मिरवले नाही. अन्यथा, लांबून कोणीतरी नातेवाईक गृहमंत्री नातेवाईक असला तरी सर्व डिपार्टमेंट चालवतात. असे म्हणताच एकच हस्या पिकला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सेवा उपक्रम, एक्स ट्रॅकर उपक्रम, विविध सोशल मीडिया पेजेस शुभारंभ तसेच स्मार्ट पोलीस ठाणे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, आनंद भोईटे, मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील, प्रेरणा कट्टे यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, सहाय्यक पोलीस आयुक्त राजराम रामराव पाटील त्यांचं शॉर्टफोर्म नाव देखील आर.आर. पाटील आहे. ते आणि आम्ही 1990 पासून एकत्र काम करत होतो. सभागृहात एकाच बेंच वर बसायचो. दुर्दैवाने आर. आर. पाटील लवकर सोडून गेले. ते त्याही वेळेस गृहमंत्री होते. सर्वाधिक 12 वर्ष ते गृहमंत्री राहिले. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्याही वेळेस पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त राजराम पाटील हे अधिकारी होते. पण कधी ही ते गृहमंत्र्यांचा भाऊ आहे मिरवले नाहीत. ते अत्यंत शांत, संयमी आणि सरळ व्यक्ति आहेत. नाहीतर एखाद्याचा लांबून कोणीतरी नातेवाईक गृहमंत्री असला तरी सर्व डिपार्टमेंट चालवत असतो. राजराम पाटील यांची पोलीस सेवा ही 33 वर्ष झाली असून स्वतःचा सख्खा भाऊ 12 वर्ष गृहमंत्री होते. तरी देखील वीस वर्षे साइड ब्रँच ला काम केले.