पुणे-शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक ( Shivsena leader Raghunath Kuchik ) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांची निपक्षपातीपणे चौकशी होईल. त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केली आहे.
कुणावरही कारवाई करताना पुरावे महत्त्वाचे-
उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) म्हणाले, की कोणताही पक्ष असू द्या, आपल्या पक्षातील कार्यकर्त्याने इतकी विकृती दाखवून समाजात खालच्या पातळीवर जाऊ नये. हीच सगळ्यांची इच्छा असते. असे आढळले तर पक्ष कारवाई ( Party Action on party worker ) करतो, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. मात्र, कारवाई करताना पुरावे महत्त्वाचे आहेत. रघुनाथ कुचिक यांच्या प्रकरणात सध्या पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या प्रकरणात कुठलाच राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
Shivsena Leader Raghunath Kuchik : रघुनाथ कुचीक यांच्या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही- अजित पवार - शिवसेना उपनेते बलात्कार गुन्हा
उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) म्हणाले, की कोणताही पक्ष असू द्या, आपल्या पक्षातील कार्यकर्त्याने इतकी विकृती दाखवून समाजात खालच्या पातळीवर जाऊ नये. हीच सगळ्यांची इच्छा असते. असे आढळले तर पक्ष कारवाई ( Party Action on party worker ) करतो, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
रघुनाथ कुचीक यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल
पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. लग्नाचे आमिष दाखवत तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपातदेखील केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांना जामीनदेखील मिळाला आहे.
हेही वाचा-CM Yogi Adityanath : कर्तव्यनिष्ठेने जबाबदारी पार पाडल्याने आत्मिक समाधान मिळते - योगी आदित्यनाथ