महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit Pawar on Booster Dose : बूस्टर डोसचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा - अजित पवार

लसीकरणात महाराष्ट्र जरी देशात दुसऱ्या क्रमाकांवर असला ( Maharashtra second in corona vaccination drive ) तरी ग्रामीण भागात दुसऱ्या डोसबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. लसीकरणात पुणे जिल्ह्यात वेग वाढवण्यात ( Vaccination Drive in Pune during pandemic ) आला आहे. या यासंदर्भात जिल्ह्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

By

Published : Dec 10, 2021, 4:37 PM IST

Updated : Dec 10, 2021, 4:45 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे -ओमायक्रॉनचे राज्यात रुग्ण आढळल्यानंतर बूस्टर डोसबाबत ( Booster dose after Omicron ) चर्चा सुरू आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. नागरिकांनी दुसऱ्या डोसबाबत टाळाटाळ करू नये, अन्यथा कडक निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar warning on vaccination ) यांनी दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

लसीकरणात महाराष्ट्र जरी देशात दुसऱ्या क्रमाकांवर असला ( Maharashtra second in corona vaccination drive ) तरी ग्रामीण भागात दुसऱ्या डोसबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. लसीकरणात पुणे जिल्ह्यात वेग वाढवण्यात आला आहे. या यासंदर्भात जिल्ह्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

नागरिकांनी दुसऱ्या डोसबाबत टाळाटाळ करू नये

हेही वाचा-Pune Omicron Cases : पुणेकरांना मोठा दिलासा... 7 पैकी 5 ओमायक्रॉनचे रुग्ण निगेटिव्ह

बूस्टर डोसचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा-
जगभरात ओमायक्रॉन या नव्या विषाणूने हाहाकार माजवला आहे. तब्बल 30 पेक्षा जास्त देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. बूस्टर डोसबाबत आज झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत. सर्वप्रथम दोन्ही डोस कसे देता येईल यादृष्टीने प्रयत्न करत आहोत. कारण दोन्ही दोस घेतलेल्यांना या विषाणूचा फार काही त्रास होत नसल्याचे आढळून आले आहे. तर काही प्रकरणात बुस्टर डोस घेतलेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात त्रास झाला आहे. परंतु बुस्टर डोस द्यायचा असेल तर त्याचा निर्णय देशपातळीवर घेतला पाहिजे. कारण देशाच्या पंतप्रधानांनी आणि केंद्र सरकारने दोन डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे तिसरा डोस घ्यायचे असेल तर सिरम इन्स्टिट्यूटकडे तो ( Booster dose in Serum ) उपलब्ध आहे. त्यामुळे आधी दोन्ही डोस 100 टक्के आणि त्यानंतर बुस्टरचा विचार करता येईल, केंद्र सरकार बुस्टर डोसबाबत निर्णय घेऊ शकते, असेदेखील यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा-Omicron Variant : मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवणार, पालिका खरेदी करणार 20 लाख अँटीजन टेस्ट कीट



अशी कडक कारवाई करणार की पुन्हा कोणाची हिंमत नाही होणार

आरोग्य भरती प्रकरणात पेपर फुटी झाली आहे. त्यात हे प्रकरण संचालकांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की हे अत्यंत दुर्दैवी आहे. पारदर्शकप्रमाणे परीक्षा व्हायला पाहिजे. ज्यांनी कोणी चुका केल्या असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पुढच्या वेळी अशा पद्धतीची कोणी चूक करणार नाही, अशी कारवाई करण्यात येणार आहे. एमपीएससीमार्फत परीक्षा घेण्यात येणे शक्य नाही. तसे केले तर परीक्षेला खूप वर्षे लागेल. परीक्षा रद्द करायची की काय याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेऊ ( MH deputy CM on exam paper leak ) , असेदेखील यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा-राज्यात ओमायक्रोनचे 10 रुग्ण, घाबरू नका - आरोग्य मंत्री राजेश टोपे

बूस्टर डोसची राज्याकडून केंद्र सरकारकडे मागणी-

लहान मुलांच्या लसीकरणासह ( Covid Vaccination ) ज्येष्ठांना बूस्टर डोस ( Booster Dose) देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope on Booster Dose ) यांनी नुकतेच जालन्यात बोलताना दिली. शाळा सुरू झाल्याने 11 ते 20 वर्षे वयोगटातील मुलांचा एकमेकांशी संपर्क वाढल्याने या वयोगटातील कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. या मुलांचे लसीकरण तातडीने केले पाहिजे असे टास्क फोर्सचेही मत आहे, असे टोपे यांनी सांगितले.

Last Updated : Dec 10, 2021, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details