पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या उद्घाटन सोहळ्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्घाटन न करताच तसेच परत जावे असा विचार माझ्या मनात येथील गर्दी पाहिल्यानंतर आला होता. परंतु कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असता, म्हणून मी कार्यक्रमाला आलो असं अजित पवार यांनी म्हटले आहे. गर्दीबाबत दिलगिरी व्यक्त करतो असं देखील यावेळी अजित पवार यांनी म्हटले.
नवीन चेहेऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न - पवार
आघाडीत काम करत असताना कुणी काही जरी वक्तव्य केलं तर तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल असं सांगा, तीनही पक्षांना सोबत घेऊन काम करायचे आहे. यंदा पक्षाच्या वतीने नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. हा सोहळा चांगल्या प्रकारे पार पडला, मात्र तुम्ही कोरोनाचे नियम पाळले नाहीत, याची खंत वाटत असल्याचे यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे.