पुणे- गुप्तवार्ता विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पोलीस बदल्यांतील भ्रष्टाचाराबाबतचा अहवाल फोडल्याप्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब पोलीस आज नोंदविणार आहेत. याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्ष राज्यभर आंदोलन करणार आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. कृपया आरोप प्रत्यारोप बंद करा. सर्वांनी मिळून हे बंद करायला हवं आणि विकासाला महत्व दिलं पाहिजे. त्यातून राज्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास करायला हवा, असेही यावेळी पवार म्हणाले. सुसगाव येथील नाला व रस्ता रुंदीकरणाच्या कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आरोप प्रत्यारोप बंद करा, सर्वांनी मिळून विकासाला महत्व दिलं पाहिजे; उपमुख्यमंत्री अजित पवार - ahjit pawar on CBI
आपल्या राज्यात कधीही नोटीस देणं किंवा वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणे अशी परिस्थिती कधीच नव्हती. प्रत्येकाने आपआपलं काम करावं. जनता ज्याच्या पाठीशी आहे त्याने त्यांच्या पद्धतीने काम करावं. जबाबदार व्यक्तीने जबाबदार पदावर काम करत असताना कसं बोललं पाहिजे, कस वागलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे.
आपल्या राज्यात कधीही नोटीस देणं किंवा वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणे अशी परिस्थिती कधीच नव्हती. प्रत्येकाने आपआपलं काम करावं. जनता ज्याच्या पाठीशी आहे त्याने त्यांच्या पद्धतीने काम करावं. जबाबदार व्यक्तीने जबाबदार पदावर काम करत असताना कसं बोललं पाहिजे, कस वागलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. जर सर्वच स्थरावर झालं तर चांगलं आहे. लोकांना एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नसून लोकांना त्यांच्या पाण्याचं, ड्रेनेजच आणि इतर काम करण्यात रस आहे. परंतु त्यांचा प्रश्न राहतो बाजूला आणि मग आरोप प्रत्यारोप सुरू होतात. हे बंद झालं पाहिजे असं देखील यावेळी पवार म्हणाले.