पुणे - मला पंतप्रधानांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे असे म्हणत, अलिकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होतात, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar In Pune) भर सभेत राज्यपालांचे नाव न घेता त्यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रारच केली. 'छत्रपती शिवरायांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेच्या स्वप्नातली रयतेचे राज्य निर्माण केले. (Ajit Pawar On Governor) त्यामध्ये महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत लावली. (PM Narendra Modi to visit Pune today) या महामानवांबद्दल होणारे वक्तव्य महाराष्ट्राला पटणारी नाहीत, महाराष्ट्राला ते मान्य नाही.' असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच कुणाचे नाव न घेता पंतप्रधान मोदींकडे राज्यपालांची तक्रार केली.
Ajit Pawar In Pune : सन्माननीय व्यक्ती काहीही वक्तव्य करतात! भर सभेत पंतप्रधानांकडे राज्यपालांची तक्रार - अजित पवार राज्यपाल वक्तव्य
अलिकडे महात्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होतात. छत्रपती शिवरायांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेच्या स्वप्नातली रयतेचे राज्य निर्माण केले. त्यामध्ये महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत लावली. (PM In Pune Today) यांच्याबद्दल होणारे वक्तव्य महाराष्ट्राला पटणारी नाहीत, महाराष्ट्राला ते मान्य नाहीत. असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच कुणाचे नाव न घेता असे वक्तव्य करणारांना समज दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार
काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवजी महाराजांबद्दल तर पुण्यात महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला. अनेक ठिकाणी आंदोलन, निषेध झाले. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची भर सभेत थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली असे बोलले जात आहे.
Last Updated : Mar 6, 2022, 1:45 PM IST