महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धोका नाही' - Maharashtra deputy CM over corona

कोरोना नियंत्रणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्व आमदारांना कोविड-19 विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य सरकार मंजुरी देईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Apr 17, 2021, 2:37 AM IST

पुणे-महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ते कोरोना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विकास आघाडी सरकार बदलण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा, असे वक्तव्य केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पंढरपूर येथे सुरू असलेल्या प्रचारादरम्यान कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असे विचारले असता अजित पवार म्हणाले, निवडणुका लावल्या तर घरातून प्रचार होऊ शकत नाही. आम्हालाही अनेकदा वाटते की आता निवडणुका नको होत्या. पण हे आमच्या हातात नाही. राज्यातील सहकाराच्या निवडणुका पुढे ढकलणे आमच्या हातात होते. या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. पंढरपूर आणि मंगळवेढ्यात काही झाले तर त्याला आम्ही जबाबदार असणार आहोत, असे सांगत अजित पवार यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले.

सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्व आमदारांना कोविड-19 विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य सरकार मंजुरी देईल, असेही अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


हेही वाचा-सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी-मुख्यमंत्र्यांचे आढावा बैठकीत निर्देश

नियम पाळले नाही तर, कडक लॉकडाऊन
रेमडेसिविरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियम पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी कडक नियम पाळावेत, अन्यथा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखी कडक लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

हेही वाचा-नागपुरात कोरोनाने 75 जणांचा मृत्यू; 6196 नवे बाधित

वापरात नसलेले सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना तात्पुरत्या स्वरुपात द्यावेत-

पुढे पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण रुग्णालय व दळवी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट उभा करावा. मनुष्यबळाअभावी शासकीय रुग्णालयात वापर होत नसलेले व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना तात्पुरत्या स्वरुपात वापरासाठी द्यावेत. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन विद्युतदाहिनी बसविण्याची कार्यवाही करावी. डॉक्टरांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. गृह अलगीकरणातील रुग्णांकडून नियमांची काटेकोर पालन होते का, याकडे लक्ष द्या.

ABOUT THE AUTHOR

...view details