पुणे - सिरम इन्स्टिट्यूट ने निर्मित केलेल्या कोरोना आजारावरील कोविशील्ड लस आता देशभरात पाठवण्याच्या तयारीत असून ही लस पाठवण्यासाठी असलेल्या परवानगी ची प्रतीक्षा सुरू आहे. सोमवारी 11 जानेवारीला पुण्यातून या लसी ची देशभरात वाहतुकीला सुरवात होऊ शकते. कोविशील्ड लसी ची देशभरातील वाहतूक ही पुणे विमानतळावरून केली जाणार आहे. यासाठी विमानतळ सज्ज असल्याचे पुणे विमानतळाचे संचालक कुलदीप सिग यांनी ईटीव्ही शी बोलताना सांगितले.
कोविशील्डच्या वाहतुकीसाठी विमानतळ सज्ज असून वाहतुकीला सुरूवात नाही
कोविशील्ड लसीच्या वाहतुकीसाठी पुणे विमानतळ सज्ज करण्यात आले आहे. मात्र, वाहतुकीला परवानगी मिळाली नसल्याने प्रतीक्षा सुरू आहे.
कोविशील्डच्या वाहतुकीसाठी विमानतळ सज्ज असून वाहतुकीला सुरूवात नाही
गुरुवारी लसी ची विमानतळावरून वाहतूक होईल असे सांगितले जात होते. मात्र, गुरुवारी ते शनिवारी या दिवसात देखील लसीची वाहतूक पुणे विमान तळा वरून झालेली नाही. लसीच्या वाहतुकीबाबत स्पष्टता नसली तरी आम्ही आमच्या बाजूने तयार आहोत कधी ही लसीची वाहतूक आम्ही देश भरात करू शकतो असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता सिरमच्या या कोविशील्ड लसीच्या वाहतुकीसाठी कधी परवानगी देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.