पुणे - एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या अल्पवयीन मुलीवर एड्सग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुण्याच्या सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजीनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका समाजसेवकाने याप्रकरणी तक्रार दिली असून संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक..! एड्सग्रस्त मुलीवर बलात्कार; संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - पुणे एड्सग्रस्त मुलीवर बलात्कार
एका समाजसेवकाने याप्रकरणी तक्रार दिली असून संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनकवडीतील बालाजीनगर परिसरात एक एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी काम करणारी संस्था आहे. यातील आरोपी या संस्थेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. मार्च महिन्यात पीडित मुलीला उपचारासाठी या संस्थेत ठेवण्यात आले होते. या दरम्यानच्या कालावधीत आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मदने करीत आहेत.
असा उघड झाला प्रकार
तक्रारदार व्यक्ती सामाजिक कार्यकर्ती असून ‘रेड लाइट एरिया’त समाज प्रबोधन करण्याचे काम करीत असते. पीडित मुलीला औषधोपचारासाठी मार्गदर्शन करीत असताना तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.