पिंपरी-चिंचवड (पुणे) : पिंपरी-चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात रुग्णसेवक आणि सेविकांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा गंभीर आरोप तेथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच, इतर अनेक मागण्यांसाठी आज (गुरुवार) रुग्णसेवक आणि सेविकांना धरणे आंदोलन केले. रुग्णालयाच्या अधिकारी रेखा दुबे यांनी मात्र हे आरोप खोडुन काढले आहेत.
धरणे आंदोलनाला बसलेल्या रुग्णसेवकांनी यावेळी आरोप केले की, रुग्ण सेवकांवर अन्याय होत आहे. रुग्णालयात जेवण व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे स्टाफ काम करण्यास इच्छुक नाही. गेल्या महिन्यात रुग्णालय प्रशासनाने आश्वासन दिले होते की, कोविड साहित्य मिळेल आणि पगारवाढ होईल. मात्र, तसे झाले नाही. आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्यात. कोविड वॉर्डमध्ये 12 तास रुग्णालयात ड्युटी करावी लागत आहे. मानसिक त्रास होत आहे, असे अनेक आरोप रुग्णालयावर केले आहेत.