पुणे पुण्यातील गणेशोत्सवाचे देखावे नेहमीच आकर्षणाचे असतात. यावर्षी 2 वर्षानंतर कोरोनाच्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे. गणेश मंडळ देखावे ही सादर करणार आहेत. त्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागत असते. पुण्यातील संगम तरुण गणेश मंडळाने मंडळाच्या देखावा सादर करण्यासाठी, यावर्षी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या गाठी भेटीमध्ये झालेला जो प्रसंग आहे, तो सादर करण्याची परवानगी मागितली होती.
पोलिसानी कायदा सुव्यवस्थेचे कारण देऊन, या संगम तरुण मंडळांना तुम्ही अफजलखानाच्या कोथळ्याचा प्रसंग दाखवू शकत नाही, असा पत्र मंडळाला पोलिसांकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे मंडळामध्ये सुद्धा आता हेच का हिंदुत्ववादी सरकार आहे, असे या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा म्हणणं आहे. संगम तरुण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत. ते पुण्यातील मनसेचे नेते ॲड किशोर शिंदे हे आहेत. ते असे म्हणाले की जर हा इतिहास महाराष्ट्राच्या शोर्यचा छत्रपतीच्या कार्यकर्तृत्वाचा आहे. इतिहास सर्वांना माहीत पाहिजे. तो पुस्तकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दाखवला जातो.
पोलिसांना मंडळाची विनंती गणेश मंडळामध्ये सामाजिक उपक्रम म्हणून का दाखवला जाऊ नये. पोलिसांना अडचण का आहे. याचा आम्हाला आश्चर्य वाटत आहे, आम्ही पोलिसांना विनंती करत आहोत. त्याने आम्हाला देखावा सादर करण्याची परवानगी द्यावी. आम्ही आता उच्च न्यायालयात सुद्धा जाऊ शकत नाही, कारण तेवढा वेळ आमच्याकडे नाही .त्यामुळे पोलिसांनी किंवा सरकारने यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे.