पुणे - गेली दोन वर्ष कोरोना मुळे सर्वानाच मोठा फटका बसला होता. तसा फटका कुंभारांना देखील बसला होता. यंदा मात्र सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने कुंभारांनी देखील यंदा मोठ्या प्रमाणात हंडी बनवले. Dahi Handi 2022 शहरातील छोटे मोठे मंडळे तसेच लहान गोपाळ हे दोन वर्षानंतर दहीहंडी साजरी होणार असल्याने हंडी खरेदीसाठी तुटून पडले आणि गेली दोन वर्षाची कसर यंदाच्या दहीहंडीत निघाली असून यंदा मोठ्या प्रमाणात हंडी विक्री झाली असल्याचे यावेळी पुण्यातील कुंभार वाडा येथील विक्रेत्याने सांगितले.
मुसळधार पावसाचा फटकायंदा जरी दहीहंडीच्या हंडी खरेदीसाठी गर्दी होत असली तरी मागच्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कुंभराना देखील बसला आहे. मुसळधार पावसाने मटकी हे वळवण्यात आले नाही. आणि याचा त्रास कुंभारांना बसला.पाहिजे तितके हंडी या मुसळधार पाऊसाने बनविता आले नाही. अशा परिस्थितीत कुंभारांनी पंख्या खाली हंडी सुखवली आणि त्यावर कलर करून दहीहंडी साठी हंडी तयार केली. तसेच, महागाईचा फटका देखील यंदा हंडी वर झालं असून वाढत्या महागाई मुळे हंडीच्या किंमतीमध्ये 10 टक्के एवढी वाढ झाली आहे.