महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सात महिन्यानंतर पुणे शहरातील उद्याने उघडली, नागरिकांची तुरळक गर्दी

सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुणे शहरातील उद्याने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली. मात्र १० वर्षाखालील मुले व ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात प्रवेश देण्यात येणार नाही.

parks opened in Pune city
पुणे शहरातील उद्याने सुरू

By

Published : Nov 1, 2020, 3:06 PM IST

Updated : Nov 1, 2020, 3:17 PM IST

पुणे - सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुणे शहरातील उद्याने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आल्यामुळे आजपासून उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्थीच्या आधारावर उद्याने खुली करण्यात आली आहेत.

शहरातील उद्याने सकाळी 6 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 7 या दोन तासात सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय 10 वर्षाखालील मुलांना आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात प्रवेश देण्यात येणार नाही.

उद्याने सुरू झाल्याने आनंदी झालेले नागरिक
आज सकाळी शहरातील संभाजी गार्डन उद्यानात व्यायाम प्रेमी नागरिकांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. काही व्यायामप्रेमी नागरिकांनी महानगरपालिकेने घेतलेल्या उद्याने उघडण्याच्या भूमिकेचे स्वागत करताना सांगितले की, शासनाने व्यायामासाठी परवानगी दिल्यानंतर आम्ही शहरातील रस्त्याच्या कडेने वॉकिंग करत होतो. तेव्हा अनेक अडचणी येत होत्या. परंतु आता उद्याने उघडल्यामुळे या अडचणी संपल्या आहेत. संभाजी उद्यानात जॉगिंगसाठी आलेली एक महिला म्हणाली, लॉकडाऊनच्या काळात घरात अथवा फूटपाथवर व्यायाम करताना चांगले वाटत नसे. त्यामुळे मी बागा उघडण्याची वाट पहात होते. बागेत जॉगिंग करताना उल्हासित वाटते. सरकारने उद्याने उघडण्याच्या निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार
Last Updated : Nov 1, 2020, 3:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details