महाराष्ट्र

maharashtra

पिंपरीत लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने केला विवाहित प्रियकराचा खून

By

Published : Aug 16, 2021, 11:54 AM IST

मृत पैगंबर याची पत्नी (वय 32) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पैगंबर आणि तरुणी आरोपी हे दोघेजण एकाच ठिकाणी कामाला होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तक्रारदाराचा महिलेचा पती हा त्याच्या प्रेयसीला भेटायला जात नाहीत. तसेच त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरून त्यांचे आरोपी प्रेयसीसोबत वाद होत होते,

प्रेयसीने केला विवाहित प्रियकराचा खून
प्रेयसीने केला विवाहित प्रियकराचा खून

पिंपरी-चिंचवड (पुणे)- पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने प्रियकराचा खून केल्याची घटना उघड झाली आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. परंतु, प्रियकराचा विवाह झालेला होता. मात्र प्रेयसी त्याच्यासोबत विवाह करण्यासाठी आग्रही होती. यातूनच त्यांच्यात वाद झाले. त्याच वादातून प्रेयसीने थेट प्रियकराचा गळा आवळून त्याचा खून केला. या प्रकरणी प्रेयसीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैगंबर गुलाब मुजावर (वय 35, रा. एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या विवाहित प्रियकराचे नाव आहे. मृत पैगंबर याची पत्नी (वय 32) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पैगंबर आणि तरुणी आरोपी हे दोघेजण एकाच ठिकाणी कामाला होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तक्रारदाराचा महिलेचा पती हा त्याच्या प्रेयसीला भेटायला जात नाहीत. तसेच त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरून त्यांचे आरोपी प्रेयसीसोबत वाद होत होते, असे तक्रारदार पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान पैगबरचा खून होण्यापूर्वी आरोपी प्रेयसीने पैगंबर याला चिंचवड स्टेशन येथील व्हाईट हाऊस लॉजमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर तो त्या ठिकाणी प्रेयसीला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. रात्री दहा वाजताच्या सुमारास तिने पैगंबर बेशुद्ध पडल्याचे लॉज मधील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनी पैगंबर यास तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details