महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dengue Patients Pune : पुण्यात डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता; महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज - येणाऱ्या काळात पुण्यात डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता

पुणे शहरात 550 च्या आसपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच पावसाळ्यात टेरेस, कुंडी आदी ठिकाणी पाणी साठलेले असते. त्यामुळे येणाऱ्या काळात डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता ( Dengue patients Pune ) देखील वर्तवण्यात येत आहे. मात्र या सर्वांसाठी महापालिकेच आरोग्य विभाग ( Municipal Health Department pune ) पूर्णपणे तयार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजीव वावरे ( Health Officer Sanjeev Wavre ) यांनी दिली आहे.

पुणे महापालिका
पुणे महापालिका

By

Published : Jul 10, 2022, 3:26 PM IST

Updated : Jul 10, 2022, 3:48 PM IST

पुणे -गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने पाऊस सुरू असून या पावसाळ्यात साथीच्या आजारांमध्ये देखील मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला नसून दररोज पुणे शहरात 550 च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच पावसाळ्यात टेरेस, कुंडी आदी ठिकाणी पाणी साठलेले असते. त्यामुळे येणाऱ्या काळात डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता ( Dengue patients Pune ) देखील वर्तवण्यात येत आहे. मात्र या सर्वांसाठी महापालिकेच आरोग्य विभाग ( Municipal Health Department pune ) पूर्णपणे तयार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजीव वावरे ( Health Officer Sanjeev Wavre ) यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना मनपा आरोग्य अधिकारी

महापालिकेमार्फत अशी घेतली जाते काळजी :महापालिकेमार्फत दोन ठिकाणी सेंटीलायझा मशीन बसवण्यात आले आहे. या मार्फत पुण्यातील कमला नेहरू आणि नायडू हॉस्पिटलमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येते. जर एखादा रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाला तर त्याला कमला नेहरू अथवा नायडूमध्ये उपचारासाठी दाखल करता येते. या शिवाय कीटक प्रतिबंधक क्षेत्रामार्फत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालायात कीटक सेवा पाठवून प्रत्येक भागात महापालिकेच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे. याशिवाय महापालिकेकडून आपण जनजागृती करतो की, नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे पाणी साठवून देऊ नये. पाणी जर साठत असेल तर जवळच्या क्षेत्रीय कार्यालयाला कळवा, याशिवाय परिसरात जर एखादा डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर त्याला शोधून तो ब्रिडींग करून तो विषाणू नष्ट करतील, त्या भागात फवारणी, धूर फवारणी करून तो डेंग्यूचा विषाणू नष्ट केला जातो. अशा प्रकारची तयारी महापालिकेकडून करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी वावरे यांनी यावेळी दिली.

'नागरिकांनी काळजी घ्यावी' :गेल्या काही दिवसांपासून बीए. ४ आणि बीए. ५ या ओमायक्रॉनच्या प्रकारांचे रुग्ण वाढत आहेत. १ ते ७ जुलै या आठवड्यात पुणे जिल्ह्यात तब्बल ६१९४ नवीन रुग्णांची भर पडली असून ही वाढ तब्बल १७ टक्के आहे. गेल्या काही दिवसांत ओमायक्रॉनचे प्रकार बीए. ४ आणि बीए. ५ यांमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसण्यास सुरुवात झाली. ही वाढ सुरु झाल्यानंतर प्रथमच पुणे जिल्ह्यात या आठवड्यात ६१९४ एवढ्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी ३,४०८ रुग्ण पुणे शहरात आहेत. शहरात तब्बल २२ टक्के वाढ दिसून येत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून ही वाढ आत्ता दररोज 400 ते 500 एवढी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात देखील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे देखील यावेळी वावरे यांनी सांगितले.

हेही वाचा -श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे 13 जुलै रोजी देणार राजीनामा : संसद अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने

Last Updated : Jul 10, 2022, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details