महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

125 Hr Sting Operation Case : सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे यांच्यातील ऑडिओ व्हायरल; 'रेड कुठे टाकायची?' - सरकारी वकील प्रवीण चव्हाण स्टिंग ऑपरेशन

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या आठवड्यात स्टिंग ऑपरेशनचा एक पेनड्राइव्ह (Pen Drive) सादर केला होता. यानंतर आता प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे (Pravin Chavan Tejas More Audio Viral) यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

sting operation
तेजस मोरे आणि प्रवीण चव्हाण

By

Published : Mar 17, 2022, 6:56 PM IST

Updated : Mar 17, 2022, 7:20 PM IST

पुणे - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या आठवड्यात स्टिंग ऑपरेशनचा एक पेनड्राइव्ह (Pen Drive) सादर केला होता. भाजप नेत्यांना अडकवण्याबाबतचा कट सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयात सुरू होता, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. यानंतर प्रकरणात रोज विविध ट्विस्ट समोर येत आहेत. बुधवारी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर आता प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे (Pravin Chavan Tejas More Audio Viral) यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

प्रवीण चव्हाण-तेजस मोरे ऑडिओ व्हायरल

नेमकं काय आहे संभाषणात?

या ऑडीओ क्लिपमध्ये सरकारी वकील हे तेजस मोरे याच्याशी जळगांव येथील विद्या प्रसारक मंडळ येथे जी रेड टाकण्यात येणार आहे त्याबाबत संभाषण करत आहेत. यात ते सांगत आहेत की

ऑडिओ क्लिप नंबर 01

प्रवीण चव्हाण :- रेड टाकायची असेल पोलिसांना तर योग्य ठिकाणी टाकता येईल ना

तेजस मोरे:- कुठल्या ठिकाणी

प्रवीण चव्हाण :- त्यांचे जे डॉक्युमेंटेशन ठेवले आहे ते कुठं ठेवले आहे.

तेजस मोरे:- बरं

प्रवीण चव्हाण:-आज ना उद्या पोलीस गेले तर कुठं रेड टाकायची

तेजस मोरे:- शिवाजी भोसलेच्या घरात सर्च करू शकतो

प्रवीण चव्हाण :- त्याच्या घरी नसणार..गणेश भोईटे त्याचा पुण्याचा पत्ता काय...ललवाणी यांना माहीत असेल त्यांना विचार..

तेजस मोरे :-बर विचारतो...मग त्याच्याकडे कॅश पण सापडेल

प्रवीण चव्हाण:- कोणाकडे

तेजस मोरे :- निलेश भोईटेकडे

प्रवीण चव्हाण:- त्याचा पत्ता घ्यायला सांगितलं आहे ना

तेजस मोरे :- सर आम्ही जाऊन आलो होतो एकदा त्याच्या घरी, वारजेला राहतो...आदित्य गार्डन सोसायटीत

प्रवीण चव्हाण :- तो राहतो का

तेजस मोरे :- हो तो राहतो ती सोसायटी खूप मोठी आहे.20 ते 25 बिल्डिंग आहे...

प्रवीण चव्हाण :- विचारून पाहा

तेजस मोरे :- हो सर

ऑडिओ क्लिप 02

तेजस मोरे :- विजू काकांनी पत्ता दिला आहे.

प्रवीण चव्हाण :- पण ते रेकॉर्ड कुठं आहे.सांगितलं का

तेजस मोरे:- सांगितलं त्याने

प्रवीण चव्हाण :- कुठं

तेजस मोरे :- घरी, अहिल्या निवास भोईटे नगर

प्रवीण चव्हाण :- आहे का शंभर टक्के

तेजस मोरे :- तीन ठिकाणे सांगितले आहे यापैकी एक ठिकाणी मिळेल

प्रवीण चव्हाण :- हे तर मलाही माहीत आहे.ते मिटिंग कुठं घेत होते काय घेत होते.जयेश भोईटे सांगू शकतो ना

तेजस मोरे:- हो ना सर..त्यांनी नाव आणि पत्ता दिला आहे का त्या लोकांचे

प्रवीण चव्हाण :- म्हणजे ते हवेतील गोळ्या आहे सगळे

अश्या पद्धतीचा दोघांमधील संवाद व्हायरल झाला आहे. या प्रकरणात दररोज आत्ता नवीन ट्विस्ट समोर येत आहेत.

Last Updated : Mar 17, 2022, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details