महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासक राज - Administrato

मार्च २०१७ मध्ये अस्तित्वात आलेल्या पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली आहे. परिणामी मंगळवारपासून महापालिकेचे सर्व नगरसेवर आणि इतर पदाधिकारी हे माजी झाले आहेत. १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रमकुमार (Commissioner Vikram Kumar) हे प्रशासक (Administrato) म्हणून कामकाज सांभाळणार आहेत.

Pune Municipal Corporation
पुणे महानगरपालिका

By

Published : Mar 15, 2022, 5:46 PM IST

पुणे:महानगरपालिका आयुक्तांनी सांगितले की, आम्ही रोज सकाळी 2 तास 10 ते 12 यावेळात वॉर्ड ऑफिसर्स, इंजनिअर्स आपल्या आपल्या वॉर्डमध्ये नागरिकांसाठी उपस्थिती राहतील. जर तिकडे देखील समाधान नाही झाले तर महापालिकेमध्ये सोमवार आणि गुरुवार दोन दिवस सकाळी 10 ते 12 या वेळात अधिकारी उपस्थित असतील. त्यांच्या मार्फत नागरिकांच्या समस्याचे निराकरण केले जाईल. तसेच मी स्वतः देखील सोमवार गुरुवार 10 ते 1 नागरिकांसाठी राखीव वेळ ठेवलेला आहे. नागरिकांनी महानगरपालिकेच्या वेबसाईटवरील टोल फ्री क्रमांकावर देखील आपल्या तक्रारी कराव्यात. असे आवाहन यावेळी केले.


पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यांमुळे इथले कामकाज कशा पद्धतीने चालणार, याबाबत उत्सुकता आहे. कार्यकाळ संपल्याने महापालिकेच्या सर्व कार्यकारिणी रविवारी बरखास्त झाल्या. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना असलेल्या सर्व सोयी सुविधा संपुष्टात आल्या आहेत. त्यांच्याकडील वाहने देखील पालिकेने जमा करून घेतली आहे. दरम्यान महापालिकेवर प्रशासक राज्य आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयकडे सर्व कामे सुपूर्द केली आहे. स्थानिक पातळीवर अडचणी यापूर्वी नगरसेवकांकडे यायच्या त्या आता प्रशासनाला पहावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता आपल्या अडचणी थेट प्रशासनाकडे मांडता येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details