पुणे:पुण्यातल्या भोर तालुक्यातील (Bare Khurd village) बारे खुर्द (Administration of Bhor Tahsil) गावातला,एक हृदय हेलावुन टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. मागचे 10 दिवस भोर तालुक्यात मुसळधार पाऊसानं थैमान घातले होते. दोन दिवसापूर्वी बारे खुर्द गावातील 68 वर्षांच्या साहेबराव बदक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र स्मशान भूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने, मुसळधार पावसात एक ते दीड किलोमीटर गुडघाभर पाण्यातून चालत त्यांची अंतयात्रा काढावी लागली. संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्ता झाला नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात अंत्यविधी साठी जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने, लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी मागणी जोर धरू लागलीय. मरणा नंतरही मृतदेहला यातना सहन कराव्या लागत असल्याचा, हा व्हिडीओ सामोर आल्यानंतर, परिसरातील नागरिकांकडून हळहळ आणि संताप व्यक्त होते आहे.
पुण्यातील घाटमार्गावर गेल्या अनेक दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडतो आहे. त्यामुळे भोर भागांमध्ये पाणीच पाणी झालेले दिसते. वरील दोन्ही धरणांमध्ये हे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने विसर्ग ही होताना दिसते. परंतु त्या पावसामुळे भोर तालुक्यातील गाव खेड्यांमध्ये रस्ते नसल्याने नागरिकांना प्रचंड अशा त्रासाला सामोरे जावे लागते .