पुणे - गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राजकीय चिखलफेक काही थांबायचं नाव घेत नाही. दररोज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय प्रदूषणाबाबत राज्यात पॉलिटीकर प्रदूषण वाढला आहे, अस वाटतंय का असा प्रश्न पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांना विचारलं असता म्हणाले की राज्यात थ्रीव्हीलरचं ( Three Wheeler Government ) चांगलं चाललं आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. पुण्यात नवीन कृषी मैदान येथे पर्यायी इंधन परिषदेतील प्रदर्शनाचे ( Alternative Fuel Conference ) उदघाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रदर्शनात विविध इलेक्ट्रिक दुचाकीच उदघाटनदेखील केले.
नागरिकांना पेट्रोल-डिझेल पेक्षा पर्याय उपलब्ध -पुण्यात पर्यायी इंधनाची जी कमतरता होती, ती भरून काढली आहे. पेट्रोल-डिझेलपासून दूर जाऊन पर्यायी इंधन कुठं मिळू शकते का, यावर काम सुरू आहे. नागरिकांना नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणे हे आधीपासूनच ऑटोमोबाईलच हब राहिलेलं आहे. त्यामुळेच आज जे काही स्टार्टअप सुरू करण्यात आल्या आहे. त्या पुण्याच्या आजूबाजूलाच सुरू करण्यात आल्या आहे. 6 ते 7 नवीन इलेक्ट्रिक दुचाकी पुण्यात लॉन्च होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, असे देखील यावेळी ठाकरे म्हणाले.