पुणे- डॉ. श्रीराम लागू यांनी चित्रपटसृष्टीत मला संधी दिली. त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही, एक कलाकार म्हणून ते जेवढे महान होते, त्यापेक्षा एक माणूस म्हणून ते अधिक महान असल्याची भावना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हेही वाचा -75 वर्षाच्या आजीबाईंनी एकरात घेतले ७ लाखांचे उत्पन्न
माझं चित्रपटसृष्टीतील प्रदार्पण हे डॉक्टर लागू यांच्यामुळे झालं, सहा - सात वर्षाची असताना झाकोळ चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू यांनी मला पदार्पणाची संधी दिली. त्यावेळी डॉक्टर लागू यांच्यासोबत पहिला शॉट शूट झाल्यानंतर त्यांनी मला उचलून घेतले होते. तसेच त्यावेळी कॅमेरामन असलेल्या गोविंद निहलानी यांना सांगितलं, बघ ही मुलगी एक दिवस खूप मोठी कलाकार होईल आणि मी तिला इंट्रोड्यूस केले, हे मी आनंदाने सगळ्या दुनियेला सांगेन, अशी आठवण मातोंडकर यांनी डॉ.श्रीराम लागू यांच्याबद्दल सांगितली.
डॉ. श्रीराम लागू यांच्या अंत्यदर्शनासाठी उर्मिला मातोंडकर पुण्यात आली होती. त्यावेळी तिने डॉ. लागूंच्या आठवणींना उजाळा दिला.