पुणे - मराठी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज (बुधवार) जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. महाराष्ट्राला पर्यावरण प्रदूषणापासून वाचवायला माळकरी आणि वारकरी पुरेसे आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली. सयाजी शिंदे यांनी यावेळी देहू गावात वारकऱ्यांसोबत वृक्षारोपण देखील केले.
जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान शुक्रवारी (दि. १२ जुन) रोजी झालेले आहे. यावर्षी कोरोना विषाणूचे संकट असल्याने पादुका आणि पालखीची प्रदक्षिणा घालून पालखी मुख्य मंदिरात विसावलेली आहे. ३० जून रोजी ही पालखी थेट पंढरपूरला रवाना होणार आहे. दरम्यान, आज चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी पालखीचे दर्शन घेतले.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी देहुत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.. तसेच वृक्षारोपण केले हेही वाचा...'आषाढी वारीतून कष्टकरी, बळीराजाला बळ मिळू दे' कार्तिकी गायकवाडचे पांडुरंगाला साकडे
वारीची परंपरा मोठी आहे. सध्या कोरोना संकटामुळे वारीचे स्वरूप बदलले आहे. करोनामुळे मानवाचे नुकसान होत आहे. तसेच पर्यावरणाचे स्वरुप बदलत आहे. तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे. 'वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी..' तर ज्ञानोबा राय यांनी सांगितले आहे की, 'झाडे लावा, जलाशय वाढवा' त्यामुळे महाराष्ट्राला पर्यावरण प्रदूषणापासून वाचवायला माळकरी आणि वारकरी पुरेसे आहेत. मी सगळ्यांना आवाहन करतो की, झाडा समोर नतमस्तक व्हा, त्याला मिठी मारा आणि त्यात तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन नक्कीच होईल, असे सयाजी शिंदे यावेळी म्हणाले.