पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत (Pune Film Festival) अभिनेते अशोक सराफ (Actor Ashok Saraf) यांचा भारतीय चित्रपट सृष्टीतील भरीव योगदानासाठी यावर्षीच्या 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड'ने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती, पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
Pune Film Festival - पिफ 2021 ची घोषणा, अभिनेते अशोक सराफ यांना मिळणार 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड
१९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत (Pune Film Festival) अभिनेते अशोक सराफ यांना 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे. पिफ २ ते ९ डिसेंबर, २०२१ दरम्यान पुण्यात होईल.
हेही वाचा -बॉलिवूड गायक कुणाल गांजावालाचं नवीन दाक्षिणात्य बाजाचं मराठी गाणं ‘भन्नाट पोरगी’!
विविध चित्रपट दाखवणार
उद्घाटन कार्यक्रमानंतर सायं ७. ३० वाजता ‘द वुमन’ (देश – मंगोलिया) हा ओटगन्झोर बॅच्गुलुन दिग्दर्शित चित्रपट ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून दाखविण्यात येईल. सदर चित्रपट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय)या दोन्ही ठिकाणी पाहता येणार आहे.तर, सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे यंदा महोत्सवातील चित्रपट दाखवले जाणार आहेत.
महोत्सवाअंतर्गत विशेष चर्चासत्र
१९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत यावर्षी ओटीटी व्यासपिठा संदर्भात एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे दररोज महोत्सवात दाखविल्या जाणा-या चित्रपटांचे ‘कँडिड टॉक्स’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. यादरम्यान चित्रपटाशी संबंधित दिग्दर्शक, कलाकार, पटकथाकार उपस्थितांशी संवाद साधतील, असेही त्यांनी सांगितले.
कँडिड टॉक्स संदर्भातील अधिक माहिती पुढीलप्रमाणे –
1)दि. ४ डिसेंबर, २०२१ – (सकाळी ११.१५ वाजल्यापासून)
चित्रपटांची नावे – टक-टक,थीन, गोत, कत्तील, फन’रल
2)दि. ५ डिसेंबर, २०२१ (सकाळी ११.१५ वाजल्यापासून)
चित्रपटांची नावे - कंदील, एली पिंकी? , पिग
3)दि. ६ डिसेंबर, २०२१ (सकाळी ११.१५ वाजल्यापासून)
चित्रपटांची नावे – अ होली कॉन्स्पीरसी, काळोखाच्या पारंब्या, ताठ कणा
4) दि. ७ डिसेंबर, २०२१ (सकाळी ११ वाजल्यापासून)
चित्रपटांची नावे - पोरगा मजेतंय, मे फ्लाय, गोदाकाठ, गॉड ऑन द बाल्कनी, इल्लीरलारे अलीगे होगलारे, फिरस्त्या, आरके/ RKAY
5)दि. ८ डिसेंबर, २०२१ (सकाळी ११.१५ पासून)
चित्रपटांची नावे – बारा बाय बारा, ज्वालामुखी, जीवनाचा गोंधळ, लैला और सात गीत, ब्रिज, जून
हेही वाचा -Paithani birthday cake : मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या पत्नीचा वाढदिवसाच्या निमित्ताने बनवला चक्क पैठणी केक