पुणे - पुणे टेरर फंडिंग प्रकरणात मुख्य आरोपी जुनैद मोहम्मद याला आज न्यायलायात हजर करण्यात आले होते. यावेळी जुनैद याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 1 जूनला मोहम्मद याची एटीएस कोठडी 7 जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. ( Junaid Mohammad 14 days judicial custody )
दहशतवादी संघटनांशी होते संबंध - दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए तोयबासाठी काम करणाऱ्या जुनैद मोहम्मद याला पुण्यातून 24 मे रोजी अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. त्याला एटीएसच्या टीमने पुण्यातील दापोडी येथून अटक केली होती. त्यानंतर बंदी असलेल्या लष्कर ए तोयबा या संघटनेत भरतीसाठी कार्यरत असलेल्या आफताब हुसेन शाह याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) स्थानिक पोलिसांच्या मदतीने जम्मू- काश्मीरमधून एक तारखेला अटक करण्यात आली होती. 1 जून रोजी आफताब याला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. आणि न्यायालयाने त्याला 14 जूनपर्यंत एटीएस कोठडीत वाढ केली होती.
पुणे टेरर फंडिंग प्रकरण : आरोपी जूनैद मोहम्मदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - Junaid Mohammad 14 days judicial custody
पुणे टेरर फंडिंग प्रकरणात मुख्य आरोपी जुनैद मोहम्मद याला आज न्यायलायात हजर करण्यात आले होते. यावेळी जुनैद याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 1 जूनला मोहम्मद याची एटीएस कोठडी 7 जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. ( Junaid Mohammad 14 days judicial custody )
पुणे टेरर फंडिंग प्रकरण
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - मोहम्मद जुनैद याची आज एटीएस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होतो. आणि आज न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.