पुणे -जप्त केलेली वाहने सोडवण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच स्विकारणार्या पोलीस कर्मचार्याला लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शरद लोखंडे असे या लाच स्विकारणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. तो चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
पुण्यात कायद्याचा धाक दाखवणाराच बनला लाचखोर; ५० हजारांची लाच स्विकारताना पोलिसाला अटक - लाच
पुण्यात जप्त केलेली वाहने सोडवण्यासाठी लाच स्विकारणाऱ्या शरद लोखंडे या पोलिसाला लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराची २ वाहने चाकण पोलीस ठाण्यात होती. ती सोडवण्यासाठी पोलीस कर्मचारी लोखंडेने तक्रारदाराकडे १ लाख ३० हजार रूपयांची लाच मागितली. तडजोडी अंती १ लाख रूपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी सापळा रचला आणि लाचेचा पहिला हप्ता ५० हजार रूपयांची लाच स्विकारताना लोखंडेला रंगेहाथ पकडले.