पुणे - डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून त्यानंतर तिला शहरातील वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जात दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. साहिल महेंद्र तापकीर (वय २३, रा. दत्तवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
व्होडका पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम पुण्यात गजाआड - deccan police news today
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. साहिल महेंद्र तापकीर (वय २३, रा. दत्तवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
![व्होडका पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम पुण्यात गजाआड minor girl](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9895580-390-9895580-1608100009208.jpg)
ओळखीचा घेतला गैरफायदा
याप्रकरणी अधिक माहिती अशी, की पीडित तरुणी ही सोळा वर्षांची आहे. आरोपी साहिल सोबत तिची ओळख झाली होती. यात ओळखीचा फायदा घेऊन आरोपी पीडित मुलीला दुचाकीवरून लॉजवर घेऊन गेला. त्याठिकाणी तिला व्होडका दारू पाजली आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला आणि त्यानंतर आईने डेक्कन पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनीही तत्काळ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहेत.