पुणे -समाजातील वंचित व गरजू मुला- मुलींना दिवाळी साजरी करता यावी यासाठी विविध उपक्रम आबा बागुल मित्र परिवाराकडून घेण्यात येतात. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना दिवाळीचा आनंद अनुभवता यावा यासाठी दिवाळी फराळ, नवीन कपडे व फटाके देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पाटावर बसवून, अवतीभवती सुंदर रांगोळी काढून, सुगंधी उटणे, मोती साबण व गरम पाण्याने मानवधर्म जोपासणारे अभ्यंगस्नान घालून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या आहेत.
आबा बागुल - काँग्रेस गटनेते व आयोजक हेही वाचा -जाणून घ्या, दीपावलीचा सण अयोध्येसाठी किती खास आहे!
उपक्रमाचे यंदा १० वे वर्ष
रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान आबा बागुल, अमित बागुल, समस्त बागुल कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांकडून या मुलांना सुवासिक तेल- उटणे लावून त्यांचे औक्षण करून मंगलमय वातारणात शाही अभ्यंगस्नान घातले. यानंतर मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशी मेजवानी देखील मिळाली. गेल्या ९ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे यंदा १० वे वर्ष आहे. शासनाने या मुलाना आधार देत त्यांच्यासाठी विशेष अशी शिक्षणाची सोय करावी आणि त्यासाठी येणाऱ्या काळात मी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी काँग्रेसचे गटनेते व आयोजक आबा बागुल यांनी सांगितलं.
रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान अन् मुले हरखून गेली -
डेक्कन येथे गुडलक चौकात झालेल्या या अनोख्या उपक्रमात पदपथावर राहणाच्या मुला-मुलींना आजची सकाळ सुखद ठरली. खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही केवळ परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. आई-वडिलांसह पदपथावर राहणाऱ्या या मुलांची सकाळ मात्र आज आनंददायी ठरली. कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वच्छता करून घातलेला रांगोळ्यांचा सडा आणि मांडलेले पाट हे चित्र बघून ती मुले हरखून गेली. सुरुवातीला शाही अभ्यंगस्नान केले. नंतर नवीन कपडे परिधान करून या मुलांनी दिवाळीचा आनंद लुटला.
रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान हेही वाचा -'व्होकल फॉर लोकल'ला सोलापुरातून उदंड प्रतिसाद; स्थानिक पणत्या खरेदीसाठी प्राधान्य