महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 5, 2022, 12:17 PM IST

Updated : Feb 5, 2022, 4:40 PM IST

ETV Bharat / city

Pune Camera Collection : पुण्यातील अभिजीत धोत्रेंकडे 600 पेक्षा जास्त कॅमेऱ्यांचा संग्रह

अभिजीत धोत्रे यांनी 1996 साली दहावी पूर्ण केली. दहावीच्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी कॅमेरा सबंधीचा डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासक्रमात त्यांना विविध कॅमेऱ्यांची माहिती मिळाली. मात्र हे कॅमेरे दिसतात कसे? असतात कसे? ते त्यांना जाणून घेण्याची इच्छा झाली आणि त्यांनी 1996 साली पुण्यातील जुन्या बाजारातून अवघ्या वीस रुपयाला एक जुना कॅमेरा विकत घेतला.

Camera collection
Camera collection

पुणे - तंत्रज्ञानाने आता खूप प्रगती केली आहे. तंत्रज्ञानामुळे कॅमेराचा शोध लागला. या तंत्रज्ञानामुळे हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी नंतर भूतकाळातील गोड आठवणी बनतात. कॅमेरामुळे त्या ताज्या होतात. पूर्वी कॅमेरा हा सर्वांच्या कुतूहुलाचा विषय होता. एखाद्या व्यक्ती जवळ कॅमेरा असणे प्रतिष्ठेचे समजले जायचे. अशात पुण्यातील एका छंदप्रिय व्यक्तीने आतापर्यंत तब्बल सहाशे कॅमेऱ्यांचा संग्रह केला आहे. अभिजीत धोत्रे असे या व्यक्तीचे नाव आहे. ते पेशाने शिक्षक आहेत.

पुण्यातील अभिजीत धोत्रेंकडे 600 पेक्षा जास्त कॅमेऱ्यांचा संग्रह

वीस रूपयांत घेतला पहिला कॅमेरा -

अभिजीत धोत्रे यांनी 1996 साली दहावी पूर्ण केली. दहावीच्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी कॅमेरा सबंधीचा डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासक्रमात त्यांना विविध कॅमेऱ्यांची माहिती मिळाली. मात्र हे कॅमेरे दिसतात कसे? असतात कसे? ते त्यांना जाणून घेण्याची इच्छा झाली आणि त्यांनी 1996 साली पुण्यातील जुन्या बाजारातून अवघ्या वीस रुपयाला एक जुना कॅमेरा विकत घेतला. कोटक कंपनीचा 70 वर्षांपूर्वीचा बॉक्स कॅमेरा त्यांनी सर्वप्रथम विकत घेतला होता. हा बॉक्स कॅमेरा त्याकाळात 50 ते 60 रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र त्यांनी तो वीस रुपयात विकत घेतला.

600 पेक्षा कॅमेऱ्यांचा संग्रह

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद -

कॅमेरा विकत घेतल्यानंतर त्याचे विविध पार्ट्स ओपन करून त्यांनी त्यावर अभ्यास केला. त्याची माहिती घेतली आणि मग त्यानंतर त्यांनी तसाच दुसरा कॅमेरा विकत घेतला. त्यातूनच विविध कॅमेरे गोळा करण्याचे वेड त्यांना स्वस्थ बसून देईना. त्यासाठी त्यांनी विविध प्रांतात भ्रमंती सुरू केली. आज त्यांच्याकडे 600 पेक्षा जास्त कॅमेरे आहेत. विशेष म्हणजे सर्व कॅमेरे चालू स्थितीत आहेत. या कॅमेरासाठी लागणारे रोल देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. या सर्व रोलची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली असून त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

600 पेक्षा कॅमेऱ्यांचा संग्रह

आज सर्वांजवळच शक्तिशाली कॅमेरा -

अभिजित धोत्रे जेव्हा कॅमेरे विकत घेत तेव्हा सदर कॅमेरे मिळवताना ते चालू स्थितीत आहे की नाही हे तपासत. जर ते चालू स्थितीत नसतील तर त्याचा मेकॅनिझम लक्षात घेऊन तो नीट तयार करणे आणि तो चालू स्थितीत तयार करून ठेवणे, याला त्यांनी सुरुवात केली. असे करता करता त्यांनी जगातील दुर्मिळ कॅमेऱ्यांचे संग्रहण केले आहेत. १९८० च्या सुमारास ग्राहक डिजिटल कॅमेरा तंत्रज्ञानाने प्रभाव निर्माण करण्यास सुरूवात केली. सोनी ही कंपनी आज कॅमेराच्या बाबतीत बाजारात प्रथम स्थानावर आहे. त्यानंतरच्या वर्षांमध्ये बर्‍याच कंपन्यांनी चांगली प्रतिमा सेन्सर, लेन्सेस् तयार करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे उच्च प्रतिमेची गुणवत्ता मिळाली आहे. आजच्या घडीला, स्मार्टफोन क्रांतीमुळे कोट्यावधी लोक त्यांच्या पॉकेट्समध्ये शक्तिशाली डिजिटल कॅमेरे बघायला मिळतात.

Last Updated : Feb 5, 2022, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details