पुणे - केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 मार्चरोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात स्मॉल इंडस्ट्रीला काय अपेक्षा आहे याबाबत फोरम अॅड स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्याशी ईटीव्ही भारतने चर्चा केली आहे. खरंतर अर्थसंकल्प ही एक हास्यास्पद गोष्ट झाली आहे. वादा आणि फक्त वादा. (Union budget 2022) ज्या योजना किंवा अनुदान फक्त आणि फक्त उद्योग क्षेत्रासाठी जाहीर केल्या जातात. (Maharashtra's budget 2022) त्या योजना स्थानिक पातळीवर उद्योजकांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे केंद्राने यंदाच्या अर्थसंकल्पात छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करावा असे यावेळी भोर म्हणाले म्हणाले आहेत.
ई व्हेईकल उद्योग वाढविण्यासाठी सरकारने येणाऱ्या अर्थसंकल्पात विचार करावा
येणाऱ्या काळात ई व्हेईकलला मोठ्या प्रमाणात डिमांड असून अनेक उद्योगक्षेत्रातील लोकांनी इलेक्ट्रॉनिक व्हेईकलच्या गाड्या वाढवायला सुरवात केली आहे. (ETV India's conversation with Abhay Bhor) हे उद्योग वाढवण्यासाठी सरकारने येणाऱ्या अर्थसंकल्पात विचार करावा आणि याबाबत तरुण उद्योजकांना स्टार्टअप आणि ते उद्योग वाढविण्यासाठी मदत करावी. तसेच, रिझर्व्ह बँकेच्यावतीने ज्या योजना सरकार अर्थसंकल्पात मांडतात त्या योजना बँकांपर्यंत केल्या जात नाही. ही खंत आहे. तसेच, सरकार मोठ्या प्रमाणात घोषणा करतात पण त्यातील कमीत कमी रक्कम देखील मिळत नाही. असे देखील यावेळी भोर म्हणाले आहेत.